राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/IMG_20201219_175457.jpg)
नागपूर -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे वयाच्या ९७ वर्षी येथे निधन झाले. आज दुपारी ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची अंत्ययात्रा रविवार २० डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता त्यांचे राहते घर- ८०, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर-२२ येथून निघणार आहे. अंबाझरी घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
मा. गो. वैद्य हे विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचार प्रमुख अशी त्यांची ओळख आहे. त्यांचे संपूर्ण नाव माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य. त्यांच्या पश्चाेत पत्नी, तीन मुली तसेच पाच मुले असा मोठा आप्त परिवार आहे.
त्यांचे मुलगेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत आहेत. त्यापैकी डॉ. मनमोहन हे संघाटे सह सरकार्यवाह, तर श्रीनिवास, शशिभूषण आणि डॉ. राम हे हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक म्हणून काम पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. ते कोरोनातून बरे झाले होते. आज दुपारी त्यांना हृदय विकाराचा धक्का बसल्याने त्यांना स्पंदन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करणयात आले.