breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
राजस्थानच्या डीजीपींचा स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/DJP-RAJSHTAHN.jpg)
जयपूर – बिहारच्या पोलीस महासंचालकांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर आता राजस्थानचे पोलीस महासंचालक भूपेंद्र सिंह यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी डीजीपी गुन्हेचे एम. एल. लाठर यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
भूपेंद्र सिंग यांना स्वेच्छानिवृत्ती मिळाल्यानंतर त्यांची राजस्थान लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. आयोगाचे विद्यमान अध्यक्ष दीपक उपरेती हे पुढील आठवड्यात सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांच्याजागी भूपेंद्र सिंग यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. भूपेंद्र सिंग १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ३० जून २०१९ मध्ये पोलीस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. यापूर्वी बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.
.