राजकीय दबावाला बळी पडून नागरिकांचे हाल सहन करणार नाही; रोहित पवार यांचा सरकारला इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/rohit-pawar-RNooPk.jpeg)
राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत. अनेक ठिकाणी विहीरी आटल्या असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. राज्यातील या पाणीटंचाईच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. तसेच राजकीय दबावाला बळी पडत प्रशासनाने सामाजिक संस्थेच्या सहकार्याने टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद केला. यावरून रोहित पवार यांनी सरकारला इशारा दिला आहे.
काही लोकांच्या राजकीय दबावाला बळी पडून प्रशासनच नागरिकांचे हाल करणार असेल तर आम्ही हे सहन करणार नाही, अशी पोस्ट रोहित पवार यांनी एक्सवर केली आहे. त्यात म्हटले आहे की, सामाजिक संस्थेच्या सहकार्याने मतदारसंघात #टँकरने सुरु असलेला #पाणीपुरवठा राजकीय दबावाखाली असलेल्या प्रशासनाने बंद करायला लावून महिला भगिनींना असं रस्त्यावर उतरण्यास भाग पाडलंय.. माझी प्रशासनाला विनंती आहे की, नागरिकांचे हाल करुन त्यांच्या संयमाचा अंत न पाहता एकतर सामाजिक संस्थेमार्फत सुरु असलेला पाणी पुरवठा पूर्ववत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी किंवा गरज असलेल्या सर्व भागात तातडीने शासकीय टँकर सुरु करावेत. काही लोकांच्या राजकीय दबावाला बळी पडून प्रशासनच नागरिकांचे हाल करणार असेल तर आम्ही हे सहन करणार नाही!
सामाजिक संस्थेच्या सहकार्याने मतदारसंघात #टँकरने सुरु असलेला #पाणीपुरवठा राजकीय दबावाखाली असलेल्या प्रशासनाने बंद करायला लावून महिला भगिनींना असं रस्त्यावर उतरण्यास भाग पाडलंय.. माझी प्रशासनाला विनंती आहे की, नागरिकांचे हाल करुन त्यांच्या संयमाचा अंत न पाहता एकतर सामाजिक… pic.twitter.com/kx0PItwhCX
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 27, 2024
माझ्या मतदारसंघात निर्माण झालेल्या भीषण #पाणी टंचाईतून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून समविचारी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सुरु असलेला पाणीपुरवठा राजकीय विरोधकांनी दबाव आणून प्रशासनाकरवी बंद करायला लावला. दुसऱ्या बाजूला #सरकारी_टँकरही सुरु करायचे नाही, हे नीच वृत्तीचं लक्षण आहे. सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सुरु असलेल्या पाण्यामुळे काहींना राजकीय पोटशूळ उठला असेल तर त्यांनी तातडीने लोकांच्या मागणीप्रमाणे सरकारी टँकर सुरु करावेत. परंतु त्यांना लोकांचे केवळ हाल करायचे असतील तर लोकंही हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाहीत, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत. अनेक ठिकाणी विहीरी आटल्या असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. राज्यातील या पाणीटंचाईच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. तसेच राजकीय दबावाला बळी पडत प्रशासनाने सामाजिक संस्थेच्या सहकार्याने टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद केला. यावरून रोहित पवार यांनी सरकारला इशारा