योगेश कुलकर्णी यांची सांगली जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष पदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Yogesh-Kulkarni.jpg)
सांगली | सांगली जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष पदी योगेश कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. त्यावेळी निवडीचे पत्र देताना युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सागर खोत, जि. प.सदस्य संपतराव देशमुख, माजी सभापती हणमंत पाटील (बापू), के.डी.पाटील, पी.वाय. पाटील, प्रतापराव यादव, आनंदराव पाटील, तानाजी कुंभार, सम्राट शिंदे, धनाजी नरुटे, रणजित कदम, मनोज चिंचोलकर, रोहित पाटील, चेतन पाटील, मानसिंग पाटील, रणजित नलवडे,आशिष कदम उपस्थित होते.
योगेश कुलकर्णी हे देशमुख साहेबांचे कट्टर समर्थक मानले जातात त्याची ओळख सत्यजित देशमुख भाऊ व हणमंत पाटील बापू यांचे निकटवर्तीय म्हणून आहे सत्यजित भाऊ यांनी त्यांना ह्या अगोदर पण विद्यार्थी संघटना , युवक संघटनेत जबाबदारी दिली होती त्याची निष्ठा आणि प्रामाणिक पनाच्या जोरावर त्यांना भाजपा पक्षात परत आता जिल्हा उपाध्यक्ष पदाची संधी उपलब्ध करून दिली आहे.