यवतमाळ जिल्ह्याची रूग्णसंख्या पोहोचली 648 वर
![The second wave is not over yet - the Ministry of Health](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/el-coronavirus-no-esta-vivo-ni-muerto.jpg)
यवतमाळ । यवतमाळ जिल्ह्यात नव्याने तब्बल 54 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर शहरातील इस्लामपूरा भागातील 46 वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सुरवातीला पॉझिटिव्ह आलेले 17 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 54 जणांमध्ये 31 पुरुष व 23 महिला आहे. जिल्ह्यात मंगळवारपर्यंत 151 पॉझिटिव्ह रूग्ण होते.
यात 54 जणांची भर पडल्याने हा आकडा 205 वर पोहचला आहे. मात्र ‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या 17 जणांना सुट्टी झाल्यामुळे व 1 पॉझिटीव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 187 झाली आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 648 झाली आहे. यापैकी 440 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात एकूण 21 मृत्युची नोंद आहे.