यंदा नवरात्री 2020 मध्ये कोणत्या नऊ रंगांची असणार रेलचेल? पहा…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/ghatasthapana.png)
भारतामध्ये यंदा शारदीय नवरात्रोत्सव लवकरच येणार आहे. त्याची धामधूम सुद्धा सुरु झाली आहे. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्रासह देशभर नवरात्र अत्यंत साधेपणाने साजरी केली जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासून नवरात्रीच्या दिवसांत प्रामुख्याने स्त्रिया नवरात्रीमधील नऊ दिवस नऊ ठराविक रंगाचे कपडे परिधान करतात. यंदा सोशल डिस्टंसिंगच्या नियमांमुळे काही बंधनं असली तरीही घरच्या घरी आणि सुरक्षितपणे हा सण साजरा करता येणार आहे. मग त्यासाठी कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे याची तयारी सुरू झाली असेल तर जाणून घेऊयात घ्या यंदा नवरात्री 2020 मध्ये कोणत्या नवरंगांची रेलचेल असणार आहे.
शारदीय नवरात्री 2020 ची सुरूवात यंदा 17 ऑक्टोबर, गुरूवार दिवशी होणार आहे. तर दसरा यंदा 25 ऑक्टोबर, रविवारी आहे. या नऊ रात्री आणि दहा दिवसांच्या काळामध्ये नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या काळात आदिशक्तीला पूजण्याचं, नवनिर्मितीच्या पावन काळात देवींच्या विविध रूपाची आराधना करण्याचं आवहन केलं जातं. त्यासाठी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि नवरात्रीची सुरूवात होते. मग जाणून घेऊयात कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करायचे आहेत ?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Navratri-colours-2020-1024x569.jpg)
नवरात्रीचे नवरंग 2020
- 17 ऑक्टोबरला राखाडी,
- 18 ऑक्टोबरला नारंगी,
- 19ऑक्टोबरला पांढरा,
- 20 ऑक्टोबरला लाल,
- 21ऑक्टोबरला निळा,
- 22ऑक्टोबरला पिवळा,
- 23ऑक्टोबरला हिरवा,
- 24ऑक्टोबरला मोरपिसी,
- 25ऑक्टोबरला जांभळा रंग आहे
दरम्यान नवरात्रीमध्ये नवरंगाचे विशिष्ट कपडे घालण्याची प्रथा ही मार्केटिंग स्ट्रॅटेजीमधून आलेला आणि पुढे लोकप्रिय झालेला ट्रेंड आहे. त्याच्या धार्मिक रूढी, परंपरांशी कोणताही थेट संबंध नाही. नवरात्रीच्या निमित्ताने आदिशक्तीची पूजा करताना महिलांमधील ऐक्य जपण्यासाठी प्रत्येक दिवशी विशिष्ट रंगाचे कपडे घालण्याचा ट्रेंड आहे.
भारतामध्ये विविध स्वरूपात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. प्रामुख्याने या निमित्ताने घटस्थापना केली जाते आणि पुढे 9 दिवस हा उत्सव चालतो. तर पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीमध्ये पंचमीपासून हा सण सुरू होतो. हा सण दुर्गा पुजा म्हणून तो ओळखला जातो.