breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

मोटोरोला रेजर स्मार्टफोनची अखेर आजपासून विक्री सुरू,10 हजारांची कॅशबॅक ऑफर सुद्धा

मोटोरोला रेजर २०१९ स्मार्टफोनची अखेर आजपासून विक्री सुरू करण्यात येणार आहे. कंपनीने दोन वेळेस याचा सेल पुढे ढकलला होता. परंतु, अखेर आज शुक्रवारपासून या सेलला सुरुवात होणार आहे. मोटोरोलाचा हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी केल्यास १० हजार रुपयांचा कॅशबॅक दिला जाणार आहे. दरम्यान, ही ऑफर केवळ सिटीबँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर देण्यात येत आहे. तसेच फ्लिपकार्टवर प्री ऑर्डर पर्याय सुद्धा देण्यात आला आहे.

प्री ऑर्डरसोबत १० हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर विक्री सुरू झाल्यानंतर ग्राहकांना मिळणार, यासंबंधीची माहिती अद्याप तरी स्पष्ट नाही. ई-कॉमर्स वेबसाइटच्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसमुळे एक्सचेंज ऑफर ठेवण्यात आली नाही. त्यामुळे जुना मोबाइल घेतला जाणार नाही. तसेच हा फोन ५२०९ रुपयांच्या प्रति महिन्यासह (ईएमआय) खरेदी करता येऊ शकणार आहे.

केंद्र सरकारने ३.० लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर देशातील काही भागात ई-कॉमर्स साईट्सला आपल्या उत्पादनाची काही अटीवर विक्री करण्यास परवानगी दिली आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये मोबाइलची विक्री होणार आहे. तर रेड झोनमध्ये याला परवानगी देण्यात आली नाही.

याआधी कंपनीने सेलची घोषणा केली होती. आधी हा सेल २ एप्रिल रोजी होणार होता. मात्र, लॉकडाऊनमुळे कंपनीला हा सेल रद्द करावा लागला होता. त्यानंतर हा सेल ६ मे रोजी आपल्या फोनच्या सेलचे आयोजन केले होते. परंतु, आता अखेर ८ मेपासून या सेलला सुरुवात होणार आहे. कंपनीने याधी रेजरची प्री-बुकिंग सुरू केली होती. मोटोच्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोल्डेबल फोनची किंमत १ लाख २४ हजार ९९९ रुपये आहे.

फोनची खास वैशिष्ट्ये :

कंपनीने या फोनमध्ये clamshell आणि फ्लिपची डिझाइन दिली आहे. तसेच युजर्संना या फोनमध्ये ६.२ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले मिळणार आहे. या फोनचे रिझॉल्यूशन ८७६x२१४२ पिक्सल आहे. फोल्ड झाल्यानंतर या फोनची स्क्रीन साइज २.७ इंचाची होते. युजर्संना या डिस्प्लेमध्ये सेल्फी क्लिक करता येवू शकणार आहे. यात मेसेज नोटिफिकेशनसह म्युझीक कंट्रोल करण्याची सुविधा आहे. या फोनच्या परफॉरमन्ससाठी ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७१० एसओसी आणि ६ जीबी रॅम देण्यात आला आहे.

मोटोरोलाने या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा प्रायमरी शूटर कॅमेरा दिला आहे. तसेच युजर्सना यात नाइट मोड व्हिजन मोड मिळणार आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात जबरदस्त फोटो काढता येवू शकतो. तसेच फोनमध्ये एआय देण्यात आला आहे. तेसच फोनमध्ये फ्रंटला पाच मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. कंपनीने या फोनमध्ये ४जी एलईटी, ब्लूटूथ, वायफाय, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी पोर्ट यासारखी सुविधाची फीचर्स दिली आहे. या फोनमध्ये २,५१० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि १५ वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button