breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मान्सूनचे केरळात आगमन; अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र, महाराष्ट्र-गुजरातेत 3 जूनपर्यंत चक्रीवादळ धडकण्याची शक्यता

नवी दिल्ली | खासगी हवामान संस्थेने 30 मे रोजी मान्सून केरळात दाखल होणार असल्याचा दावा केला होता. तर सोमवारी मान्सून केरळात दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले. त्या अनुषंगाने केरळच्या 9 जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये अलपुझा, कोल्लम, पथनमथिट्टा, तिरुवनंतपुरम, कोट्टयम, एर्नाकुलम, इडुक्की, मलप्पुरम आणि कन्नूर जिल्ह्यांचा समावेश आहे. 

दरम्यान अरबी समुद्र आणि लक्षद्वीपवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन ते 3 जूनपर्यंत गुजरातची किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने अरबी समुद्रासाठी रविवारी दुहेरी दाबाचा अलर्ट जारी केला. खात्यानुसार, अरबी समुद्रात 2 वादळे आकार घेत असून 1 आफ्रिकी िकनारपट्टीलगतच्या समुद्रावर आहे. ते ओमान आणि येमेनकडे वळण्याची शक्यता आहे. दुसरे वादळ भारताच्या निकट आहे. ते पुढील 24 तासांत कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची चिन्हे आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button