“माझ्यासारख्या माणसावरही मोदींनी जादू केली होती,नंतर खरं रूप दिसायला लागलं”…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-213.png)
सोलापूर | महाईन्यूज |
मोदीबाबाची अजूनही थोडी थोडी हवा आहे. माझ्यासारख्या माणसावरही त्यांनी जादू केली होती. सुरुवातीची दोन वर्षे मी काहीसा प्रभावितही होतो. चांगलं काम करताहेत, असं वाटतं होतं पण नंतर खरं रूप दिसायला लागलं, असे अनेक आरोप करत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/ndopLqbiecisi.jpg)
दक्षिण सोलापूरमधील औज येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात सुशीलकुमार शिंदे बोलत होते. यावेळी देशातील बदलत्या स्थितीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सावध राहण्याचे आवाहन केले. देशाची आर्थिक घडी विस्कटू लागली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Sushilkumar_Shinde_PTI.jpg)
नोकऱ्यांच्या बाबतीत तरुणांची दिशाभूल केली जात आहे. जाती-जातींत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. धार्मिक सौहार्द बिघडेल, अशी भूमिका घेऊन देशातील वातावरण दूषित करण्याचे काम केले जात आहे. या सगळ्याचा धोका ओळखून आपण सावध राहायला हवं, असं आवाहन शिंदे यांनी केलं…एवढच नाही तर शिंदे यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा आणि त्यांच्या मोदींनी ट्रम्प आणि त्यांच्या मैत्रीबाबत केलेलं भाषण या सर्वांवरच सुशीलकुमार शिंदे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत…