breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

माजी आमदार मधुकर कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन

सांगली : माजी आमदार मधुकर कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. १९९५ मध्ये जत विधानसभा मतदारसंघातून मधुकर कांबळे हे अपक्ष उमेवारीवर आमदार म्हणून निवडून आले होते. वयाच्या २९ व्या वर्षी ते आमदार झाले होते.

मधुकर कांबळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सलग दोन वेळा आमदार असणाऱ्या उमाजी सनंमडीकर यांचा मधुकर कांबळे यांनी आश्चर्यकारकरित्या पराभव केला होता. काँग्रेस मधील तत्कालीन नाराज नेते एकत्र येऊन उमाजी सनंमडीकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. श्रीमंत डफळेसरकार, विलासराव जगताप, सुरेश शिंदे यांनी मधुकर कांबळे यांची उमेदवारी जाहीर केली. अपक्ष लढणाऱ्या मधुकर कांबळे यांनी उमाजी सनंमडीकर यांचा पराभव केला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button