मराठमोळे शरद बोबडे सरन्यायाधीशपदी विराजमान, राष्ट्रपतींनी दिली शपथ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/357912-fffff.png)
नवी दिल्ली | सरन्यायाधीय रंजन गोगई रविवारी (17 नोव्हेंबरला) सेवानिवृत्त झाले आहे. त्यांच्यानंतर मराठमोळे न्यायामूर्ती शरद बोबडे यांनी सरन्यायाधीशपदाचा पदभार सांभाळला आहे. न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना पदाची शपथ दिली. शरद बोबडे देशाचे 47 वे सरन्यायाधीश आहेत. न्यायमूर्ती शरद बोबडे 23 एप्रिल 2021 रोजी सेवानिवृत्त होतील.
न्यायमूर्ती बोबडे यांनी देशातील अनेक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक निर्णय दिले आहेत. अयोध्या प्रकरणाच्या घटनापीठातही शरद बोबडे यांचा समावेश होता. या प्रकरणातही त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. याआधी यशवंत विष्णू चंद्रचूड हे सरन्यायाधीश होणारे पहिले मराठमोळे व्यक्ती होते. ते सर्वाधिक काळ म्हणजेच 7 वर्ष 4 महिने सरन्यायाधीश पदावर कार्यरत होते. रंजन गोगोई 13 महिने देशाचे सरन्यायाधीश पदाच्या कार्यकाळानंतर सेवानिवृत्त झाले आहेत. 2018 च्या जानेवारी महिन्यात तत्कालिन सरन्यायाधीशांविरोधात ऐतिहासिक पत्रकार परिषद घेणाऱ्या 4 वरिष्ठ न्यायमूर्तींमध्ये गोगोई होते. राफेल, सबरीमला या गेल्या काही दिवसांतल्या महत्त्वाच्या खटल्यांचा निकाल गोगोई यांनी दिला.