breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
मंत्री विदेशात जाणार नाहीत, तुम्हीही जाऊ नका – नरेंद्र मोदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Narendra-Modi-3.jpg)
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणू बाबत देशातील नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी एकापाठोपाठ एक टि्वट करुन खबरदारी घेण्यास सांगितले आहे. दहशतीला ना म्हणा तर बचावाला हा म्हणा. केंद्र सरकारमधील एकही मंत्री येणाऱ्या दिवसांत विदेश दौरा करणार नाही.
मी आपल्या देशवासियांना आग्रह करतो की आवश्यकता नसेल तर प्रवास करु नका. आम्ही सर्व सभा टाळून सर्वांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊ, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी आपल्या दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटले की, कोविड-१९ च्या (कोरोना विषाणू) स्थितीवरुन सरकार सतर्क आहे. सर्व मंत्रालये आणि राज्यांना नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलण्यास सांगितले आहे. हा मोठा टप्पा आहे. यात व्हिसाचे निलंबनसह आरोग्य सेवांच्या क्षमता वाढवण्याचाही समावेश आहे.