breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारत बायोटेक-अमेरिका करार; कोरोना लस उत्पादन करणार

नवी दिल्ली – कोरोनावर पहिली देशी लस तयार करणाऱ्या हैदराबादच्या भारत बायोटेकने अमेरिकेतील विद्यापीठासोबत करार केला आहे. त्यामुळे या लसीची तेथे चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर कंपनीला अमेरिका, जपान आणि युरोप वगळता अन्य देशांना या लसीचे वितरण करण्याचे हक्क मिळणार आहेत. आम्ही १ अब्ज लसींचे उत्पादन करणार आहोत, असेही भारत बायोटेकने म्हटले आहे.

भारत बायोटेकने कोरोनावर कोव्हॅक्सीन ही लस तयार केली आहे. या लसीच्या एक अब्ज डोसचे उत्पादन कंपनी करणार आहे. अमेरिकेच्या मिजुरी प्रांतातील सेंट लुईस येथील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनसोबत त्यांनी परवाना करार केला आहे. त्यामुळे लसीचे वितरण, तिची किंमत आणि आवश्यक लोकांच्या लसीकरणासाठी लागणारे मनुष्यबळ या समस्या कंपनीला जाणवणार नाहीत. या लसीची पहिली मानवी चाचणी सेंट लुईस विद्यापीठातील परीक्षण केंद्रात घेतली जाणार आहे. त्यानंतर या लसीच्या चाचणीचे पुढील टप्पे भारतात होणार आहेत. नियामक संस्थेची मान्यता मिळाल्यानंतर हैदराबादमधील जिनोम व्हॅलीतील भारत बायोटेकच्या कारखान्यात या लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाणार आहे.

कोरोनावरील बहुतांश लसी इंजेक्शने दिल्या जातात. परंतु भारत बायोटेकच्या या लसीचे डोस नाकात थेंब टाकून दिले जातात. यामुळे कोरोनापासून संरक्षण होते. याशिवाय नाक आणि घशातील पेशींमध्ये डोस जात असल्यामुळे इतर प्रकारची प्रतिकारशक्तीही वाढते. सध्या संशोधन आणि निर्मितीच्या टप्प्यात असलेल्या लसींमध्ये हे साध्य होऊ शकणार नाही, अशी माहिती वाशिंग्टन विद्यापीठाचे संचालक डॉ. डेव्हिड टी. कुरियल यांनी दिली. आमची लस नाकात थेंब सोडून दिली जाते त्यामुळे सुया, सिरीज, आदींची गरज नाही. याशिवाय एकाच वेळी आम्ही एक अब्ज लोकांना डोस देऊ शकतो, अशी माहिती भारत बायोटेकचे अध्यक्ष डॉ. कृष्णा एला यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button