breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘भारत’ ठेवणार ड्रॅगनच्या हालचालींवर खास ड्रोनने करडी नजर

नवी दिल्ली: चीनसोबतच्या सीमावादाच्या (India China Border Dispute) पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराकडे (Indian Army) आता नवीन अस्त्र आलं आहे. हे अस्त्र लष्कराचा तिसरा डोळा  ठरणार असून सीमेवर ड्रॅगन करत असलेल्या हालचालींवर त्याची गुप्त नजर असणार आहे. लष्करासाठी DRDOने ‘भारत’ हे खास ड्रोन (Drone technology) विकसित केलं असून लेह-लडाखच्या दुर्गम सीमावर्ती भागात ते लष्करासाठी वापरण्यात येणार आहे.

अतिशय प्रतिकूल निसर्ग आणि दऱ्या खोऱ्यांच्या या प्रदेशात त्यामुळे लष्कराला मोठा फायदा होणार आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे या भागात गस्त घालणाऱ्या सैनिकांना काम करणं हे आव्हानात्मक असतं. त्यात चीन सगळे नियम पायदळी तुडवत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा खोल दऱ्यांमध्ये किंवा उंच टेकड्यांवर नेमकं काय चाललं हे कळत नाही. त्यामुळे अशा वेळी ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button