breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

भारतात येणार अमेरिकेचे विदेश अन् संरक्षण मंत्री

अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीसाठी प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. परंतु मुत्सद्देगिरीवर याचा कुठलाच प्रभाव दिसून येत नाही. अमेरिकेचे विदेशमंत्री माईक पॉम्पियो आणि संरक्षणमंत्री मार्क ऍस्पर पुढील आठवडय़ात पहिल्यांदाच एकत्र भारत दौऱयावर येत आहेत. निवडणुकीचा निकाल काहीही लागो, भारतासोबतच्या संबंधांवर याचा प्रभाव पडणार नसल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱयाने स्पष्ट केले आहे.

विदेश मंत्री पॉम्पियो यांच्यासह पुढील आठवडय़ात भारत दौऱयावर जात आहे. भारत आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा भागीदार आहे. या शतकात हिंद-प्रशांतची भागीदारी महत्त्वाची ठरणार असल्याचे ऍस्पर यांनी म्हटले आहे. रशिया आणि चीन मिळून जागतिक शक्तीचे जाळे तयार करू पाहत असताना भारत आणि अमेरिका आव्हानांना सामोरे जाण्यास तयार असल्याचे संकेत ऍस्पर यांनी यावेळी दिले आहेत.

चर्चेतील मुद्दे

भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक संवेदनशील मुद्दय़ांवर चर्चा होणार आहे. चिनी आगळिकीदरम्यान गुप्तचर माहितीच्या देवाणघेवाणीवर भर राहणार असल्याचे मानले जात आहे. भारत सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. हा देश शक्तिशाली आणि प्रभावशाली लोकांचा आहे. तेथील लोक दरदिनी आव्हानांना तोंड देतात. चीनची हिमालय क्षेत्रातील आक्रमक भूमिका याचे उदाहरण असल्याचे ऍस्पर यांनी म्हटले.

संबंधांवर परिणाम नाही

अमेरिकेतील निवडणुकीच्या निकालाचा भारतासोबतच्या संबंधांवर कुठलाच प्रभाव पडणार नसल्याचे स्पष्ट करू इच्छितो. भारत आणि अमेरिकेचे संबंध कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा वरचढ आहेत. भविष्याविषयी विचार करायचा असून भारताची यात सर्वात मोठी भूमिका राहणार असल्याचे उद्गार अमेरिकेचे उपविदेशमंत्री स्टीफन बिगन यांनी मंगळवारी रात्री काढले आहेत.

सैन्यतयारीही सुरू

भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया पुढील महिन्यात मालाबार सागरी युद्धाभ्यास करणार आहेत. चीन या युद्धाभ्यासामुळे यापूर्वीच चिंतेत पडला आहे. या युद्धाभ्यासात चारही देशांची सर्वात आधुनिक शस्त्रास्त्रs आणि युद्धनौका सामील होणार आहेत. चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कूटनीतिक तणाव सुरू आहे. दुसरीकडे चीनच्या प्रत्येक आगळीकीला प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे जपाननेही स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button