भारतातील कोरोनाबाधितांची संख्या ६३,९४,०६९ वर
![2,95,041 new positive patients in 24 hours in the country; 2,023 deaths](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/India_Corona.jpg)
- २४ तासांत ८१,४८४ नवे रुग्ण
नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्याने वाढत आहे. आता भारतातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 63 लाखांच्या पुढे गेली आहे. मागील 24 तासांत देशात 81 हजार 484 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 1 हजार 95 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 63 लाख 94 हजार 69 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 99 हजार 773 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 53 लाख 52 हजार 78 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 9 लाख 42 हजार 217 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
दरम्यान, सध्या देशात कोरोनाच्या चाचण्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. १ ऑक्टोबर रोजी देशभरात १० लाख ९७ हजार ९४७ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. तसेच आतापर्यंत ७ कोटी ६७ लाख १७ हजार ७२८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.