breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भाजप नेत्याच्या भावाकडून भीषण कृत्य

चंद्रपूर | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन आहे. लॉकडाउनमुळे अनेक राज्यात मजूर अडकले आहे. तर नागरिकांना घरीच राहण्याचं आवाहन करण्यात आहे. परंतु, घरीच अडकल्यामुळे एका भाजप नेत्याच्या भावाची मानसिक स्थिती बिघडली आणि त्यातून त्याने मुलांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे.

जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात भगतसिंग वॉर्डात मंगळवारी संध्याकाळी झालेल्या हत्याकांडाने परिसर हादरून गेला. ज्येष्ठ भाजप भाजप नेते शिवचंद द्विवेदी यांच्या घरी ही गोळीबाराची घटना घडली. या नेत्याच्या भावाने स्वतःच्या 2 मुलांना घरगुती भांडणानंतर रिव्हॉल्व्हरने गोळ्या घातल्या आणि स्वतःही गोळी झाडून आत्महत्या केली. मुलांवर गोळ्या झाडून स्वत: आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव मूलचंद द्विवेदी आहे. या गोळीबारानंतर रुग्णालयात नेताना एका मुलाचं निधन झालं तर दुसरा मुलगा अत्यवस्थ आहे. चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी नागपुरात हलवण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button