भाजपा नेते सत्यजित देशमुख यांच्या पुढाकाराने अर्सेनिक अल्बम-30 औषधाचे वाटप; योगेश कुलकर्णी यांची माहिती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/8-3.jpg)
शिराळा । महाईन्यूज । प्रतिनिधी
स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या प्रेरणेतून युवा नेते सत्यजित देशमुख (भाऊ) यांच्या माध्यमातून आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप माजी सभापती हनमंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिराळा गावामध्ये गोळ्या वाटप करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांकडे गोळ्या देण्यात आल्या, अशी माहिती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी यांनी दिली.
तसेच, शिराळा तहसीलदार ऑफिस, शिराळा पोलीस स्टेशन, शिराळा पंचायत समिती, सह्याद्री खरेदी विक्री संघ शिराळा, वकील संघटना शिराळा, प्राथमिक शिक्षक संघटना, शिराळा ग्रामस्थ, रिळे, कोकरूड पोलीस स्टेशन, मोहरे, चरण, पनूब्रे वारूण, कुसळेवाडी,काळूनंदरे यांना वितरित करण्यात आल्या यावेळी ज्येष्ठ नेते प्रतापराव यादव (भाऊ),अभिजीत खांडेकर, सम्राट शिंदे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य कोकरूड राजवर्धन देशमुख, प्रा.सम्राट शिंदे, अभिजीत यादव,बाबजी घोडेपाटील उपस्थित होते.