breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूमुळे 6 लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या

कोरोना विषाणूमुळे खस्ताहाल झालेल्या अर्थव्यवस्थेसाठी ब्रिटनच्या सरकारने अनेक पावले उचलली. त्यात कर कपातीपासून नवीन नाेकऱ्या निर्माण करण्यासाठी सवलती देण्यापर्यंतच्या गोष्टींचा समावेश आहे. ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनाक म्हणाले, आमचे सरकार ३० अब्ज पौंडच्या पॅकेजसह अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्याअंतर्गत नोकरी गमावलेल्या लोकांना पुन्हा नोकरी देण्याच्या बदल्यात नियोक्त्यास प्रती कर्मचारी ९५ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी नियुक्त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यास दर महिन्याला ५२० पौंडची भरपाई द्यायची आहे. त्याचबरोबर त्यांना पुन्हा नोकरीवर ठेवणे अनिवार्य असेल.

नियुक्तांना बोनसचा निधी एकरकमी मिळेल. ब्रिटनच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार कोरोनामुळे देशात सुमारे ६ लाख लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. ऑर्गनायझेशन फॉर को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटने एक इशारा दिला आहे. त्यानुसार वर्षाखेरीस बेरोजगारी दर ११.७ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. कोरोनाची दुसरी लाट आल्यास हा आकडा वाढू शकतो. सरकार प्रत्येकाची मदत करू शकत नाही हे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नसल्याबद्दल सुनाक यांनी प्रसार माध्यमांसमोर खेदही व्यक्त केला. आगामी काळ आणखी आव्हानात्मक आहे. देशात मंदीच्या काळात सर्वांच्या नोकऱ्या वाचवणे हे सरकारसाठी शक्य नाही. त्याशिवाय स्वयंरोजगाराशी जोडलेले २५ लाख लोकांना निधी देण्यासाठी सरकारने एक व्यापक योजना तयार केली आहे. त्यामुळे प्रत्येकाला काही स्वरूपात मदत मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button