breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

ब्राझीलने भारताकडे मागितले तत्काळ दोन कोटी लसीचे डोस

नवी दिल्ली – कोरोनाच्या लसीकरणारा अनेक देशांत सुरुवात झाली आहे. त्यातच ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारे यांनी धक्कादायक विधान केलं होतं. कोरोनावरील लस घेतली, तर माणसं मगर होतील आणि महिलांना दाढी येईल, असं ते म्हणाले होते. मात्र, आता त्यांनीच भारताकडून तत्काळ लसीचे २ कोटी डोस मागितले आहेत. भारताने कोरोनावरील दोन लसींना आपत्कालीन वापराला परवानगी दिल्यानंतर त्यांनी ही मागणी केली आहे.

सीरम इन्स्टिट्युट आणि ऑफ्सफर्ड युनिर्व्हसिटीने संयुक्तपणे केलेल्या लसीला भारतात परवानगी मिळाली आहे. तर, भारय बायोटेकच्या कोविशिल्ड लसीलाही परवानगी मिळाली आहे. त्याच काळात ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. अॅस्ट्रॉझेनेकाच्या लसीचा तात्काळ पुरवठा करावा, असं आवाहन बोलसोनारो यांनी केलं आहे. ऑक्सफर्ड आणि एस्ट्रॉझेनेकाच्या लसीला परवानगी मिळालेली असून, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ही लस तयार केली जात आहे.

भारतात ही लस कोविशिल्ड नावाने बाजारात आणली गेली आहे. बोलसोनारो यांचं पत्र त्यांच्या माध्यम कार्यालयाने प्रसिद्ध केलं आहे. “ब्राझीलमध्ये राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम तातडीने सुरू करण्यासाठी भारतातील लसीकरण मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेत कोविड लसीचे २० लाख डोस तातडीने पाठवावे,” असं बोलसोनारो यांनी पत्रात म्हटलं आहे. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या क्रमवारीत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्ये करोनामुळे दोन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बोलसोनारो यांनी अनेकदा अजब विधानं केली होती. कोरोनावरील लसीसंदर्भातील त्यांचं एक विधान प्रचंड गाजलं होतं. “फायझर-बायोएनटेकची लस घेतली, तर माणसं मगर होतील आणि बायकांना दाढी येईल. लस घेऊन तुमची मगर झाली, तर तो तुमचा प्रश्न असेल, तुमचं तुम्ही पहा,” असं अजबगजब विधान त्यांनी केलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button