breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

बिहार काँग्रेस कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचा छापा

पटना – बिहार काँग्रेसचे प्रदेश मुख्यालय असलेल्या ‘सदाकत आश्रम’ येथून एका वाहनातून मोठय़ा प्रमाणात रोकड जप्त करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱयांनी अचानक छापा टाकत ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी प्राप्तिकर अधिकारी ठाण मांडून नेत्यांची चौकशी करत होते.

सदाकत आश्रम येथे सुमारे दोन तास प्राप्तिकर विभागाकडून कारवाई सुरू होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस कार्यालयातील वाहनातून लाखो रुपये जप्त करण्यात आले. त्यानंतर कार्यालयात प्रवेश करून त्याठिकाणीही अधिकाऱयांनी तपास सुरू केला. प्राप्तिकर अधिकाऱयांबरोबरच राज्य पोलिसांचा मोठा फौजफाटाही यावेळी घटनास्थळी उपस्थित होता. पोलिसांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर एक नोटीस चिकटवली आहे.

काँग्रेस पक्षाशी संबंधित बिहारमधील काही स्थानिक नेते प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या संशयास्पद व्यवहारांच्या संदर्भात प्राप्तिकर विभागाचे पथक त्यांची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत वाहनातून किती रोख रक्कम जप्त करण्यात आली याबाबत प्राप्तिकर विभागाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. मात्र, सध्या बिहारमध्ये होत असलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम मतदारांना वाटण्यासाठी आणण्यात आली होती काय? याची चाचपणी केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button