Breaking-newsताज्या घडामोडी
बंदोबस्तावरील पोलिसाला टँकरने उडवले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Accident.jpg)
अहमदनगर | बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक पोलिसाला एका टँकरनं धडक दिल्यानं तो गंभीर जखमी झाला आहे. नदीम शेख असं जखमी कर्मचाऱ्याचं नाव असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नगर-औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास येथे आज पहाटे हा अपघात झाला. अपघातात अहमदनगर वाहतूक शाखेचे पोलीस नदीम शेख यांच्या डोक्याला मार लागला आहे. बायपास येथे वाहने सोडण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे. त्या ठिकाणी पोलीस मुख्यालयातील कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक टँकर भरधाव आला. टँकरने बॅरिकेडिंग उडवून दिले. त्यात शेख यांना वाहनाची धडक बसून ते गंभीर जखमी झाले. तर काही अंतरावर जाऊन टँकरही उलटला. इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी शेख यांना नगरमधील खासगी हास्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.