ताज्या घडामोडीराष्ट्रिय

पूर्णा- हैद्राबाद रेल्वेच्या शौचालयात अचानक स्फोट; स्फोटात एक तरुण गंभीर जखमी

परळी | महाईन्यूज |

पूर्णा- हैद्राबाद रेल्वेच्या शौचालयात अचानक स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. परळी स्टेशनवर रेल्वे उभी होती त्यावेळी ही घटना घडली. सय्यद अक्रम असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे.

सय्यद अक्रम हा तरुण पूर्णा- हैद्राबाद रेल्वेत त्याच्या कुटुंबासोबत चढला होता. ही रेल्वे परळी रेल्वे स्थानकात आली. त्यावेळी रेल्वेचे इंजिन बदलण्याचे काम सुरू असताना रेल्वे डब्यातील शौचालयात स्फोट झाल्याचा आवाज आल्याने प्रवाशांत मोठी धावपळ उडाली.काही प्रवाशांनी शौचालयाचा दरवाजा उघडला असता त्यात एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. स्फोट नेमका कशाचा झाला हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

या स्फोटानंतर दहा मिनिटांनी रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहचले आणि जखमी तरुणाला रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र स्फोट नेमका कशाचा होता, याचा तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button