breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते सीसीटीव्ही सर्व्हेलन्स व पीए सिस्टीमचे लोकार्पण

सांगली| महाईन्यूज

जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतर पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सीसीटीएनएस व पीए प्रणालीचे लोकार्पण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले आहे.

ट्राफिकला शिस्त लावण्यासाठी व कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने ही प्रणाली अत्यंत महत्वपूर्ण आहे असे सांगून या प्रणालीबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी अवगत केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले आदि उपस्थित होते.

राज्यातील जनतेला सुखी, समाधानी आणि चिंतामुक्त करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी, कामगार, कष्टकरी यांचे हित डोळ्यासमोर ठेवून लोकाभिमुख आणि गतीमान प्रशासनासाठी जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा निश्चित पूर्ण करण्यात येतील, असे सांगून आर्थिकदृष्‍ट्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त नव्हेच तर चिंतामुक्त करण्याच्या निर्धाराने 2 लाख रूपये पर्यंतचे पीक कर्ज माफी करणारी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली आसून याचा जिल्ह्यातील जवळपास 93 हजार 290 शेतकऱ्यांना सुमारे 722 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ मिळणार आहे. या योजनेची गतीमान अंमलबजावणी करण्याचे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button