breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पश्चिम बंगाल : नागरिकत्व कायद्याविरोधात निषेध, अनेक ठिकाणी नाकेबंदी

आंदोलकांकडून रास्ता रोको, रेल्वे रुळही अडवले, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान

कोलकाता । महाईन्यूज । ऑनलाईन टीम

पश्चिम बंगालच्या नादिया, नॉर्थ २४ परगणा आणि हावडा जिल्ह्यात हिंसाचाराच्या छोट्या छोट्या घटना घडल्या आणि सुधारित नागरिकत्व कायद्याचा निषेध केला जात आहे.

नॉर्थ २४ परगणा आणि नादिया जिल्ह्यातील आमडंगा आणि कल्याणी भागातील आंदोलकांनी रास्तारोको आंदोलन केले. त्यांनी जिल्ह्यातील विविध स्थानकांमधील रस्ते आणि रेल्वे रुळांनाही अडवले असल्याचे पोलिसांनी सांगितले

हावडा जिल्ह्यातील डोमजूर भागात आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले आणि नरेंद्र मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल करण्यात आला आहे

आंदोलनकर्त्यांनी रेल्वे स्थानकांवर जाळपोळ आणि सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड केल्याने गेल्या दोन दिवसांत हिंसक निषेधांमुळे राज्यातील काही भागांत तणाव निर्माण झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button