breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

निर्भयाच्या गुन्हेगारांवर दररोज तब्बल ५० हजारांचा खर्च

नवी दिल्ली | महाईन्यूज

निर्भयाचे चारही गुन्हेगार तिहार तुरुंगात कैद असून, त्यांच्या सुरक्षेवर दररोज जवळपास ५० हजार रुपये खर्च करण्यात येत आहेत. कोर्टानं त्यांना फासावर लटकावण्यासाठी डेथ वॉरंट जारी केला, त्या दिवसापासून त्यांच्या सुरक्षेसाठी दररोज हजारो रुपये खर्च केले जात आहेत. कोठडीच्या बाहेर तैनात केलेले ३२ सुरक्षा रक्षक आणि फाशीच्या तयारीसाठी करण्यात येणारी कामे यांच्यावर हा खर्च केला जात आहे. सुरक्षा रक्षकांना विश्रांती मिळावी यासाठी दर दोन तासाला ड्युटी बदलली जात आहे.

तुरुंगातील सूत्रांच्या माहितीनुसार, चौघाही जणांना तिहारमधील जेल क्रमांक ३ मध्ये वेगवेगळ्या कोठड्यांमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. प्रत्येकाच्या कोठडीबाहेर दोन सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यातील एक हिंदी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असलेला तामिळनाडू विशेष पोलीस दलातील कर्मचारी आणि एक तिहार तुरुंग प्रशासनातील अधिकारी आहेत. गुन्हेगाराच्या कोठडीबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांची दर दोन तासाला ड्युटी बदलली जाते. त्यांना आराम दिला जातो. प्रत्येक कैद्यासाठी २४ तासांसाठी आठ-आठ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. म्हणजेच चार कैद्यांसाठी एकूण ३२ सुरक्षा रक्षक तैनात आहेत. ते २४ तासांत ४८ शिफ्टमध्ये काम करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button