breaking-newsताज्या घडामोडी

नाशिक जिल्हा रुग्णालयाचं दोन वर्ष फायर ऑडिट झालंच नाही

नाशिक – भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयाचं फायर ऑडिट झालं नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानंतर आरोग्य विभागाच्या कारभाराची लख्तरं वेशीवर टांगली गेली आहे. आता राज्यातील सर्वच रुग्नालयांचं फायर ऑडिट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. दरम्यान, भंडारा दुर्घटनेनंतर नाशिक जिल्हा प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. कारण गेल्या 2 वर्षांपासून इथल्या जिल्हा रुग्णालयाचंही गेल्या 2 वर्षांपासून फायर ऑडिट झालेलं नाही.

वाचा :-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज भंडारा दौऱ्यावर, रुग्णालयाची करणार पाहणी

नाशिक जिल्हा रुग्णालय, मालेगाव रुग्णालयासह जिल्ह्यातील 18 ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांचं 2 वर्षांपासून फायर ऑडिटच झालं नसल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. जिल्हात फक्त दोनच फायर ऑफिसर असल्यामुळे वेळेवर फायर ऑडिट होत नसल्याची माहिती बाधकाम विभागानं दिली आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button