breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

नारायण मूर्तींचे जावई ऋषी सुनाक बनले ब्रिटनचे अर्थमंत्री

लंडन | जायंट टेक कंपनी इन्फोसिसचे फाउंडर नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक (39) यांची आज(गुरुवार) ब्रिटेनच्या अर्थमंत्रीपदी वर्णी लागली आहे. सध्या ते ट्रेजरी मुख्य सचिव पदी होते. ब्रेग्जिटच्या काही आठवड्यानंतर साजिद जावीद यांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंत ऋषी यांना या पदाची जबाबदारी सोपवली आहे.

सरकारच्या वार्षीक अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी कॅबिनेटमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यापैकी सुनक (चांसलर ऑफ एक्सचेकर) यांच्या नियुक्तीला सर्वात मोठा बदल मानले जात आहे. ऋषी 2015 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडूण आले होते. ते 2018 मध्ये स्थानिक सरकारच्या मंत्रीमंडळात सामील झाले होते. 2019 मध्ये त्यांना ट्रेजरीचा चीफ सेक्रेटरी बनवण्यात आले.

ऋषी यांना कंजर्वेटिव्ह पार्टीमध्ये महत्वाचे स्थान आहे. मीडिया इंटरव्ह्यूसाठी सरकारकडून तेच बोलतात. याशिवाय पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या निवडणूक प्रचारातही त्यांची महत्वाची भूमिका होता. अनेक वेळेस टीव्ही डिबेटमध्ये पंतप्रधानांऐवजी ऋषी सहभाग घेतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा |

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button