breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

नागपूरकरांसाठी दिलासादायक बातमी; कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या होतेय कमी

नागपूरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होताना पहायला मिळत आहे. नागपूरकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. कोव्हिड विषाणूचा विळखा शहराभोवती अंशत: का होईना कमी होत चालला आहे.

पूर्वीच्या तुलनेत संशयितांच्या घशातील स्त्राव नमुन्यांच्या तपासणीचे प्रमाण कमी झालेले असले तरी एकूण संशयितांपैकी पॉझिटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाणही आता सरासरीच्या तुलनेत बरेच घसरले आहे. करोनाची लक्षणे असल्याच्या संशयातून निदानाला येणाऱ्यांपैकी बहुतांश जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे यातू सकारात्मक चित्र समोर येत आहे.


दरम्यान काल 2 ऑक्टोबरला दिवसभरात जिल्ह्यातून १५१३ करोनाबाधितांना उपचारानंतर कुठलीही लक्षणे दिसून न आल्याने डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या ७९,९६८ रुग्णांपैकी ६५१७७ रुग्णांनी आजावर मात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button