breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

नागपुरात आजपासून मेट्रो सेवेलाही सुरुवात

नागपूर – कोरोनाच्या संकटामुळे मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, अनलॉक-५ जाहीर करण्यात आल्यानंतर आजपासून मेट्रो सेवेलाही सुरुवात होत आहे. आजपासून सीताबर्डी इंटरचेन्ज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान सकाळपासून रात्री ८ दरम्यान दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु राहणार आहे.

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामेट्रोने ५० टक्के सवलत दिलीय.तसंच येत्या रविवारपासून ऑरेंज मार्गिकेवर रिच -१अंतर्गत सीताबर्डी इंटरचेन्ज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान त्याच प्रमाणे प्रवासी सेवा सुरु होतेय. मेट्रो प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक आहे.

मास्क घातल्याशिवाय कुठल्याही प्रवाश्याला मेट्रो स्थानकावर प्रवेश मिळणार नाही. स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येक प्रवाश्याचे तापमान तपासले जाणार आहे.प्रवाश्यांनी डिजिटल पद्धतीने प्रवास-भाडे द्यावीत यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं जात आहे. उपकरणांना स्पर्श कमी व्हावा यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. सर्व मेट्रो ट्रेन आणि स्टेशनचे सातत्याने निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button