breaking-newsताज्या घडामोडी

नांदेडमध्ये चार शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार

नांदेडमध्ये गुरु-शिष्य परंपरेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. बिलोली तालुक्यातील चार शिक्षकांनी इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी रामतीर्थ पोलिस ठाण्यात या चारही नराधम शिक्षकांविरोधात पॉक्सो कायदा, कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सय्यद रसूल, दयानंद राजुरे, प्रदीप पाटील आणि धनंजय शेळके या अत्याचार शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना साथ देणाऱ्या एका महिला कर्मचारीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही आरोपी फरार झाले आहेत. या चार शिक्षकांनी सामूहिक बलात्कार करत असताना पीडित विद्यार्थीनीला अश्लील व्हिडिओ दाखवल्याचे सांगण्यात येते. घडलेल्या सारा प्रकार या पीडितेने आपल्या कुटुंबीयांना सांगितला. पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button