breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा
नांदेडमध्ये आणखी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह, कोरोना बाधितांची संख्या 31 वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/coronavirus-75-1.jpg)
नांदेड | नांदेडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सकाळी तिघा जणांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा अद्याप सुरूच असताना दुपारी आणखी दोघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नांदेड शहर आणखी हादरले आहे.
शनिवारी 20 आणि रविवारी 5 नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याने ही संख्या आता 31 वर पोहचली आहे.आज आढळून आलेल्या 5 पैकी एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही नवे रुग्ण परिसरातील आहेत.