breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
नववर्षाच्या सुरुवातीला कोरोना लसीला परवानगी मिळण्याची शक्यता
नवी दिल्ली – ब्रिटन आणि रशिया मध्ये कोरोना लसीला परवानगी मिळाल्यानंतर आता भारतातही लसीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. असे संकेत खुद्द दिल्लीतील एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया याांनी दिले आहेत. तेे एबीपी न्यूजशी बोलत होते.
डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं की, नववर्षाच्या सुरुवातीला कोरोना लसीला परवानगी मिळेल. देशातील 100 टक्के लोकांना कोरोनाची लस देण्याची गरज नाही. 50 ते 60 टक्के लोकांना वॅक्सिन दिल्यानंतर कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल. तो वाढणार नाही.