धक्कादायक! संसद भवनाजवळ काश्मीरचा संशयित तरुण ताब्यात, कागदावर मिळाले ‘कोडवर्ड’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/IMG_20200826_232332.jpg)
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत संसद भवनाजवळ एका संशयीत तरुणाला सुरक्षा दलांनी ताब्यात घेतलेलं आहे. तो काश्मीरचा रहिवासी असून त्याच्या जवळ कोडवर्ड लिहिलेली एक चिठ्ठी सापडलेली आहे. विजय चौकात संशयास्पद स्थितीत फिरतांना त्याला CRPFने ताब्यात घेतलेलं आहे. चौकशीत तो वेग वेगळी माहिती देत असल्याने सुरक्षा दलांची चिंता वाढलेली आहे. संसदभवन परिसर हा हाय सेक्युरेटी झोन असल्याने असा युवक सापडल्याने सुरक्षा दलांची चिंता वाढलेली आहे.
CRPFच्या जवानांनी या युवकाला ताब्यात घेतल्यानंतर संसद भवन मार्ग पोलीस स्टेशनमध्ये त्याची चौकशी सुरु आहे. या चौकशी दरम्यान त्याने वेगवेगळी माहिती दिलेली आहे. त्याच्या जवळ आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स सापडलेलं आहे. मात्र त्या दोन्हीवर त्याची नावं ही वेगवेगळी आहेत. ड्रायव्हिंग लायसन्सवर त्याचं नाव फिरदौस असं असून आधार कार्डावर त्याचं नाव मंजूर अहमद अहंगेर असं आहे. तो दिल्लीत कुठे राहतो आणि कधी आला याबद्दलही त्याच्या माहितीत तफावत आढळून आलेली आहे.