धक्कादायक! बाइकवरून घरी जात असताना न्यूज चॅनलच्या पत्रकाराला गोळ्या घालून भरचौकात हत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/IMG_20200825_103511.jpg)
बलिया: उत्तर प्रदेशमधील गुन्हेगार दिवसेंदिवस निर्भय होत चाललेले आहेत. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात एक अशीच खळबळजनक घटना घडली आहे. सोमवारी संध्याकाळी दुचाकींवरून जात असताना एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला गोळ्या घालून ठार केले आहे. रतन सिंह असे या पत्रकाराचे नाव आहे. ही घटना लुना पोलीस स्टेशनच्या परिसरातील आहे. या खूनामुळे जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे. या घटनेबाबत पत्रकारांमध्ये प्रचंड संताप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री गुन्हेगारांनी रतन सिंह यांच्या घराजवळ गोळी झाडली आहे. पोलिस अधीक्षक देवेंद्र नाथ यांनी सांगितले की, एका वादातून आरोपींनी पत्रकार रतन सिंह यांची गोळ्या घालून हत्या केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तर बलिया वर्किंग जर्नालिस्ट्स युनियनने सिंह यांच्या हत्येबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.