breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार

बंगळुरु: बंगळुरु मध्ये एका भीषण अपघातात गर्भवती महिलेसह 7 जणांंचा जागीच मृत्यु झाल्याची माहिती मिळत आहे. प्राप्त माहितीनुसार, बंंगळुरु येथे कालाबुर्गी येथील सावालगी गावाजवळ एक ट्रक उभा होता, या ट्रक ला एका कारची धडक बसली आणि हा अपघात झालेला आहे. अपघाताचं स्वरुप जरी सर्वसाधारण वाटत असलं तरी ही धडक इतकी भीषण होती की या मध्ये कारमधील प्रवाशांंचा जागीच मृत्यु झालेला आहे. यासंदर्भात आता कालबुर्गी पोलिसांंनी अहवाल नोंंदवुन घेतलेला आहे.

तर हे सातही मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आलेले आहेत. याशिवाय ट्रकचा पण मागील भाग तुटला असुन कारचा तर अक्षरशः चुराडा झालेला आहे. कार आणि ट्रक च्या या भीषण अपघातातील मृतांंची माहिती पोलिसांंनी मिळवुन त्यांंच्या नातेवाईकांंशी संपर्क साधण्याचे काम सुरु आहे, या मध्ये गर्भवती इरफाना बेगम (वय 25), रुबिया बेगम ( वय 50), आबेडबी (वय 50), जैचुनबी (वय 60), मुनीर (वय 28), मोहम्मद अली (वय 38) आणि शौकत अली (वय 29) यांंचा मृत्यु झालेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button