धक्कादायक! ‘पुलवामा हल्ला आम्हीच घडवला’, पाकिस्तानच्या मंत्र्यांनी इम्रान खानला दिलं श्रेय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/napak.jpg)
इस्लामाबाद: जम्मू आणि काश्मीरमध्ये पुलवामा इथं झालेला हल्ला हा आम्हीच घडवला आहे. इम्रान खान सरकारचं ते सगळ्यात मोठं यश आहे अशी कबुली पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी दिलेली आहे. पहिल्यांदाच पाकिस्तानच्या मंत्र्यानेच अशी कबुली दिल्याने खळबळ उडाली असून पाकिस्तानचा दहशतवादी घटनांमधला सहभाग पुन्हा एकदा उघड झालेला आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानच आहे आणि त्याचे भारताकडे पुरावे आहेत असा भारताचा दावा होता. त्यावर पाकिस्तानने ते कधीच मान्य केलं नाही.
मात्र आता खुद्द सरकारच्या मंत्र्यानेच ती कबुली दिल्याने पाकिस्तानचा खरा चेहरा उघड झाल्याचं म्हटलं जातं आहे. पाकिस्तानच्या ताब्यात गेलेला भारताचा पायलट कॅप्टन अभिनंदनला सोडलं नाही तर भारत रात्री 9 वाजता पाकिस्तानवर हल्ला करू शकतो असं परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी त्यावेळी एका बैठकीत सांगितलं होतं असा दावा पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते अयाज सादिक यांनी केला होता. त्यामुळे भीतीने पाकिस्तानने अभिनंदनची सुटका केली अशी इम्रान खान यांच्यावर टीका होऊ लागली आहे.