धक्कादायक, चीनच्या प्रसिद्ध स्टोअरमधील महिलेच्या हस्तमैथुनाचा व्हिडीओ झाला व्हायरल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/masturbation-bad-for-you.jpg)
ग्राहकोपयोगी सामानाची विक्री करणाऱ्या चीनमधील प्रसिद्ध इकीया कंपनीच्या स्टोअरमध्ये एक महिला हस्तमैथुन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. फर्निचर स्टोअर्सच्या शोरुममध्ये ठेवलेल्या सोफा आणि बिछान्यावर बसून ही महिला हस्तमैथुन करत असल्याची ही व्हिडीओ क्लिप आहे.
चिनी सोशल मीडियावरुन हा व्हिडीओ हटवण्यात आला आहे. जवळपास ९० लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला. “यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी चीनमधील स्टोअर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काळजी घेऊ” असे इकीयाकडून सांगण्यात आले आहे.
“आमचा अशा प्रकारांना विरोध असून आम्ही याचा निषेध करतो. आम्ही तात्काळ शहरातील पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली आहे” असे इकीयाकडून सांगण्यात आले. कुठल्या शाखेमध्ये हा प्रकार घडला ते इकीयाकडून सांगण्यात आलेले नाही. ती महिला कोण होती व चित्रीकरण कोणी केले त्यांची ओळख उघड केलेली नाही.