breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
देशात २४ तासांत ६२ हजार २२१ नव्या कोरोना रुग्णांची तर ८३७ मृतांची नोंद
नवी दिल्ली – गेेल्या २४ तासांत देशात ६२ हजार २२१ नव्या कोरोना रुग्णांची तर ८३७ मृतांची नोंद झाली आहे. आजच्या नव्या रुग्णसंख्येमुळे देशात ७४ लाख ३२ हजार ६८१ एकूण रुग्णसंख्या झाली आहे.
सध्या देसात ७ लाख ९५ हजार ०८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत ६५ लाख २४ हजार ५९६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी उपचार केले आहेत. तर, एकूण मृतांचा आकडा १लाख १२ हजार ९९८ वर जाऊन पोहोचला आहे. गेल्या दीड महिन्यांनंतर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ लाखांच्याही खाली गेली आहे.
देशात सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात असून त्या खाली कर्नाटकचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ९० हजार १९२ आहे तर, कर्नाटकात १ लाख १२ हजार ४४६ आहे.