Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
देशात कोरोनाने २४ तासांत ४०,४२५ नवे रुग्ण
![In India, 1,03,558 new corona patients a day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/coronavirus-e-chernobyl-2.jpg)
नवी दिल्ली | कोरोना व्हायरसचा प्रसार देशभरात अतिशय झपाट्यानं होत असल्यामुळं आता चिंतेत भर पडू लागली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मागील चोवीस तासांमध्ये देशभरात तब्बल ४०,४२५ नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे.
कोरोना रुग्णांचा हा उद्रेक पाहता आता देशभरातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येनं ११ लाखांचा आकडा ओलांडला आहे. मागील चोवीस तासांत देशभरात ६८१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही ११,१८,०४३ इतकी झाली आहे. ज्यामध्ये ३,९०,४५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, ७,००,०८७ रुग्णांनी या विषाणूवर मात केली आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनामुळं जीव गमवावा लागलेल्यांची संख्या २४,४९७ वर पोहोचली आहे.