breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
देशात आतापर्यंत 73 जणांना लागण, कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/coronavirus.jpg)
मुंबई | भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 73 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लोकसभेत याबाबतची माहिती दिली. देशातील आकडा सत्तरीपार झाला असताना, इकडे महाराष्ट्राती कोरोनाबाधितांचा आकडा 11 वर पोहोचला आहे.
केंद्र सरकार सातत्याने राज्यांशी संपर्क करुन, दररोज सविस्तर अहवाल मागवत आहे. याशिवाय भारत सरकारकडून परदेशातील भारतीयांनाही मायदेशी आणण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित राज्यांमध्ये केरळचा पहिला नंबर लागतो. केरळमध्ये आतापर्यंत 17 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Corona-cases-in-India.jpg)
त्याखालोखाल महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रात 11, उत्तर प्रदेशात 10, दिल्ली 6 आणि कर्नाटकात चौघांना कोरोनाची लागण झाली आहे.