देशातील लोकशाही धोक्यात; यशवंत सिन्हांचा भाजपला ‘जय श्रीराम’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/सिन्हा.jpg)
पाटणा : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सिन्हा यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि पक्षाचे अध्यक्ष यांच्यावर टीका केली होती. पाटणा येथे झालेल्या कार्यक्रमात सिन्हा यांनी भाजप सोबतचे सर्व प्रकारचे संबंध तोडल्याचे सांगितले. तसेच आपण अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही, असे ही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा, काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी आणि राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव देखील उपस्थित होते. दरम्यान, सिन्हा यांनी राष्ट्र विचार मंचाची स्थापना केल्याचे सांगितले.
संसदेचे कामकाज चालत नाही म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधीही विरोधी पक्षांसोबत चर्चा केली नाही. सभागृहाचे कामकाज का चालत नाही यावर त्यांनी एकदाही विरोधी पक्षांची एकत्र बैठक बोलवली नाही. याउटल संसदेचे कामकाज होत नाही याचा सरकारला आनंदच झाला होता. कारण विरोधक अविश्वासाचा प्रस्ताव आणणार होते, असे सिन्हा म्हणाले.