देशातील कोरोनाबाधितांची संख्या 80,88,851 वर
![2,95,041 new positive patients in 24 hours in the country; 2,023 deaths](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/India_Corona.jpg)
- 24 तासांत 48,648 नवे रुग्ण
नवी दिल्ली – देशात दररोज समोर येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत मागील अनेक दिवसांपासून काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात 48,648 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 563 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 80,88,851 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1,21,090 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 57,386 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 73,73,375 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 5,94,386 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉकच्या काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली होती. मात्र आता रुग्णसंख्या घटताना दिसत आहे.