breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशातील कोरोनाच्या बळींची संख्या वाढली,मृतांचा आकडा आता 7 वर

देशातील कोरोनाच्या बळींची संख्या वाढतच चालली आहे. गुजरातच्या सूरतमध्ये एका ६९ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. याशिवाय बडोद्याच्या एका रुग्णालयात ६५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झालाय. मात्र या महिलेच्या कोरोना चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही. गुजरातच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिलीय.  . आपर्यंत देशात ३४० हून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याच समोर आलं आहे. महाराष्ट्रातही रविवारी कोरोना विषाणूने एका वयोवृद्धाचा बळी घेतला होता. राज्यातील हा दुसरा बळी ठरला. 

कोरोनाशी लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन करण्यात आले होते. परिणामी रविवारी देशभरातील नागरिकांनी घरामध्ये राहून ‘जनता कर्फ्यू’ला चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.

कोणतीही लस उपलब्ध नसलेल्या कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी गर्दी टाळणे हाच एकमेव पर्याय असल्यामुळे सरकार या अनुषंगाने योग्य ती कठोर पावले उचलत आहे. रेल्वे मंत्रालयाने ३१ मार्यपर्यंत प्रवासी रेल्वे सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर महाराष्ट्र 31 मार्च पर्यंत लॉकडॉउन करण्यात आला आहे…

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button