breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशाच्या विविध राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा स्कायमेटने व्यक्त केला अंदाज

देशाच्या विविध राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. बंगालच्या खाडीतून येणा-या सप्टेंबर महिन्यातील पहिल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा जोरदार पाऊस बरसणार आहे. याचा प्रभाव बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशामध्येही मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे.

म्यानमारकडून हे कमी दाबाचे क्षेत्र येणार आहे. यामुळे मान्सून आणखी सक्रीय होईल. पावसाचा जोर वाढेल. जूनपासून सप्टेंबरपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसाचा शेवट कदाचित या कमी दाबाच्या क्षेत्राच्या मुसळधार पावसाने होईल, अशी शक्यता आहे. २१ सप्टेंबरच्या आसपास हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल, उत्तर ओरिसाच्या आतील भागात प्रवेश करेल.

मध्य भारतात प्रवेश केल्यानंतर याचा वेग किंचित कमी होईल. त्यानंतर त्याचा प्रवास राजस्थानकडे होईल. २४ सप्टेंबरच्या आसपास हे क्षेत्र मध्य प्रदेशावर राहील. याचा प्रभाव बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशावर राहील; येथे मोठा पाऊस होईल. राजस्थान आणि दिल्लीवर पावसाचे ढग राहतील. पाऊस मात्र पडणार नाही. दरम्यान, याच काळात राजस्थानातून मान्सून आपला परतीचा प्रवास सुरु करणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button