Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
देशपातळीवर NRC करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय नाही – गृहराज्यमंत्री
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Sansad.jpg)
नवी दिल्ली | देशपातळीवर राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी दिली. लोकसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे.
सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या दोन्ही मुद्द्यांवरून देशातील वातावरण सध्या ढवळून निघाले आहे.
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला अनेक नागरिकांचा विरोध आहे. विरोधी पक्षांनीही याला विरोध केला आहे. काही राज्य सरकारांनी त्यांच्या विधीमंडळात ठराव करून एनआरसी करू देणार नसल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिलेले उत्तर महत्त्वाचे मानले जात आहे.