breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्ली विधानसभा: भाजपाकडून सुषमा स्वराज यांच्या कन्या देणार केजरीवालांना टक्कर ?

नवी दिल्ली | महाईन्यूज

राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीला जोर चढण्यास सुरुवात झालेली आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना रोखण्यासाठी काँग्रेस आणि भाजपकडून रणनिती तयारी करण्यात येत आहे. केजरीवाल यांच्या नवी दिल्ली मतदार संघात काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कन्या लतिका दीक्षित मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून माजी केंद्रीय विदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवी दिल्ली विधानसभा मतदार संघातून बासुरी स्वराज यांना उमेदवारी देण्यासंदर्भात पक्षात विचार सुरू आहे. बासुरी यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून आपली पदवी पूर्ण केलेली आहे. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर बासुरी आपल्या पित्यासमवेत दिल्ली उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयात प्रशिक्षण घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button