breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्ली दंगलीचा कट रचल्याप्रकरणी माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक

मुंबई – दिल्ली दंगल प्रकरणात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला रविवारी (१३ सप्टेंबर) रात्री अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उमर खालिद याला UAPA अर्थात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही अटक केली आहे. दरम्यान, आज (१४ सप्टेंबर) त्याला न्यायालयात हजर केले जाईल. तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर दिल्ली पोलिसांकडून उमर खालिदला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

दिल्ली दंगलीचा कट रचल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून उमर खालिदची चौकशी करण्यात आली. या ११ तासांच्या चौकशीनंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून दिल्ली हिंसाचार प्रकरणातील सूत्रधार असल्याचा आरोप ठेवत उमर खालिदला अटक करण्यात आली. दरम्यान, २ सप्टेंबरला देखील उमरची चौकशी झाली होती. त्याचप्रमाणे, यापूर्वी दंगलीशी संबंधित आणखी एका प्रकरणात पोलिसांनी उमर खालिदविरोधात UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

उमर खालिदला अटक झाल्यानंतर नंतर युनायटेड अगेन्स्ट हेट ग्रुपकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हणण्यात आले आहे की, “११ तासांच्या चौकशीनंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उमर खालिदला दिल्ली हिंसाचार प्रकरणातील सूत्रधार असल्याचा आरोप ठेवत अटक केली आहे. मात्र, जरी हे अटक सत्र सुरु राहिलं तरीही CAA आणि NRC विरोधातील लढा हा सुरुच राहील. त्याला जास्तीत जास्त सुरक्षा मिळणे हे सध्या आमचे प्राधान्य असून दिल्ली पोलिसांनी त्याच्या सुरक्षेसाठी योग्य ती जबाबदारी स्वीकारावी.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button