दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ‘द ग्रेट खलीचा’ पाठिंबा
![The great Khali supports Farmers Protest](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/khali-supports-farmersprotest.jpg)
मुंबईः केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. यातच भारताचा पैलवान ‘द ग्रेट खलीनेही’ आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्यामध्ये जाऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे.
खलीने जय जवान जय किसान चा नारा देत आपला सहभाग या शेतकरी आंदोलनात नोंदवला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, त्यांचा विचार न करता हे विधेयक मंजूर केले. या कायद्यामुळे शेती कराराच्या माध्यामातून शेतीवर मोठ्या कंपन्यांची मक्ती निर्माण होईल. शेतात घाम गाळणाऱ्या सामान्य शेतकऱ्याला यातून दूर लोटण्यात येईल, अशी भीती तयार झाली आहे.
अवश्य वाचाः शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 9 स्टेडियमचे कारागृहात रूपांतर करण्यासाठी दिल्ली पोलिसांची सरकारकडे मागणी
या कायद्याला देशभर विरोध असूनही त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येईल. केंद्र सरकारकडून या शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. आंदोलन चिरडण्यासाठी आंदोलकांवर आश्रू धुरांचा मारा करण्यात आला, तसेच पाण्याच्या साहाय्याने त्यांना अडवण्यात आले. सरकारने शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.