तेलंगणा मंत्र्यांनी कार्यक्रमात सर्वांसमोर व्यासपीठावर खाल्ले शिजवलेले ‘Chicken’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-240.png)
चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूच्या फैलावामुळे परिस्थिती भीषण झाली आहे. शेकडो लोकांचा यामध्ये मृत्यू झाला असून, हजारो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीननंतर इतर देशातही कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. पण या सर्वांसोबत कोरोनाबद्दलच्या अनेक अफवाही सध्या फिरताहेत.
चिकन खाल्ल्याने कोरोनाची लागण होते, अशी अफवा गेल्या काही दिवसांपासून तेलंगणामध्ये फिरत आहे. तेलंगणातील काही नागरिकांचा या अफवेवर विश्वास बसला असून, त्यांनी चिकन खाणेच बंद केले. त्यापार्श्वभूमीवर तेलंगणातील सरकारमधील मंत्र्यांनी लोकांच्या मनातील भीती घालविण्यासाठी एक वेगळाच उपक्रम केला.अफवा कायमस्वरुपी दूर करण्यासाठी तेलंगणामधील काही मंत्र्यांनी जाहीर कार्यक्रमात सर्वांसमोर व्यासपीठावर शिजवलेले चिकन खाल्ले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/222-2.png)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/1582963895_ministers-eating-chicken-hyderabad-send-message-that-chicken-isnt-possible-source-coronavirus.jpg)
तेलंगणातील मंत्री के टी रामाराव, एटेला राजेंद्र, तलसानी श्रीनिवास यादव आणि अन्य काही जणांनी शुक्रवारी संध्याकाळी एका कार्यक्रमात सर्वांसमोर शिजवलेले चिकन खाल्ले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/01.png)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/dc-Cover-5u7bq20ur5bf8bsqf8u9l43ri7-20200229055902.Medi_.jpeg)
चिकन आणि अंडी यांच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होतो ही अफवा लोकांच्या मनातून काढण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला.